Ad will apear here
Next
‘जेएसपीएम’च्या विद्यार्थ्यांनी बनवली इलेक्ट्रिकल सायकल
पुणे : ताथवडे येथील जेएसपीएम संचालित राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील निहील इनामदार व कुणाल मोरे या अभियांत्रिकी शाखेतील शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अनोखी इलेक्ट्रिकल सायकल तयार केली आहे. 

इंधनाचे वाढते दर व वाहनांमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान यावर उपाय म्हणून ही सायकल त्यांनी बनवली आहे. ही सायकल तयार करण्यासाठी त्यांनी २४ होल्टची बॅटरी वापरली असून, एकदा चार्ज केल्यानंतर ती साधारण १८ ते २० किलोमीटरपर्यंत वापरता येते, अशी माहिती मार्गदर्शक प्रा. नितीन जाधव यांनी दिली; तसेच सायकलमध्ये असणाऱ्या डायनामोमुळे चाकाची ऊर्जा वापरून पुन्हा बॅटरी चार्ज करता येते, अशी व्यवस्था यात करण्यात आली असल्याचे विभागप्रमुख डॉ. अविनाश बडदे यांनी सांगितले. 

ही सायकल बनवण्यासाठी सुरुवातीला सरासरी १० हजार रुपये इतका खर्च आला; मात्र या सायकलची मोठ्या प्रमाणात निर्मिती केल्यास हा खर्च सात ते आठ हजारांवर  येऊ शकतो, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. या सायकलमुळे पैशाची बचत, पर्यावरणाचे संवर्धन व शारीरिक व्यायाम असे फायदे होणार आहे. 

विद्यार्थ्यांच्या या अभिनव उपक्रमाबद्दल ‘जेएसपीएम’चे संस्थापक सचिव डॉ. तानाजी सावंत, प्राचार्य डॉ. आर. के. जैन, उपप्राचार्य प्रा. अविनाश देवस्थळी, प्रा. रवी सावंत व प्रा. सुधीर भिलारे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZSACC
Similar Posts
‘शाहू महाविद्यालया’तर्फे व्याख्यानाचे आयोजन पुणे : बारावी सायन्स विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षेचा व्यवस्थित अंदाज यावा तसेच त्यांची मानसिक तयारी व्हावी या हेतूने जेएसपीएम राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे ‘तयारी सीईटी परीक्षेची’ या विषयावर ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. केदार टाकळकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
‘जेएसपीएम’ची फॉर्म्युला कार ‘सुप्रा २०१९’साठी सज्ज पुणे : ‘सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनीअर्सतर्फे (एसएई) दर वर्षी घेण्यात येणाऱ्या ‘सुप्रा’ या राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी ताथवडे येथील जेएसपीएम संचालित राजश्री शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी स्वतः डिझाइन करून बनवलेली फॉर्म्युला कार सज्ज झाली आहे,’
‘जेएसपीएम’मध्ये अत्याधुनिक रोबोटिक्स तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण पुणे : ‘ताथवडे येथील जेएसपीएम संचालित राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यांत्रिकी अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागामध्ये असलेल्या सेंटर फॉर एक्सलन्स इन रोबोटिक्स अँड ऑटोमेशन या टाटा ऑटोमेशन लिमिटेड लॅबमध्ये महाविद्यालयातील ३० विद्यार्थ्यांना अत्याधुनिक रोबोटिक्स तंत्रज्ञानाचे
‘विद्यार्थ्यांना पसंतीचा विषय निवडता येणे महत्त्वाचे’ पुणे : ‘शिक्षणाचा उपयोग फक्त रोजगारकार्यक्षम व उत्तम गुण मिळवण्यासाठी नव्हे, तर देशाच्या विकासासाठी होणे गरजेचे आहे आणि म्हणूनच समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांना पसंतीच्या विषयाची निवड करता येणे अधिक महत्त्वाचे आहे,’ असे मत नवी दिल्लीच्या नॅशनल बोर्ड ऑफ अ‍ॅक्रिडिएशनचे (एनबीए) अध्यक्ष डॉ. के

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language